रायगड : झेनिथ धबधब्यावर पर्यटकांचा हैदोस सुरू असून, रायगड जिल्ह्यातील खोपोली शहराजवळ असलेल्या या धबधब्यावर वाढती गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. प्रशासनाने याबाबत पर्यटकांना ताकीद द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
प्रशासनाने या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असतानाही काही पर्यटक पर्यायी मार्गाने धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा प्रयत्न अनेकदा जीवावर बेतणारा ठरला आहे. याबाबतची कल्पना असूनही अनेक तरुण जाणूनबुजून अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस करतात.
पालकांनी आपल्या मुलांनी पर्यटनासाठी नेमके कुठे जात आहेत, याची चौकशी करणे गरजेचे असल्याची मागणीही पुढे येत आहे.
