दापोली : पर्यावरण अभ्यासक डॉ.प्रशांत परांजपे यांचे वडील कै.अशोक परांजपे सर यांच्या भागवत विषयावरील (निरूपणकार ह.भ. प .श्री आनंद बुवा जोशी यांच्या निरुपणावर आधारित ) पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने २९ जुलै २०२६ रोजी ह .भ .प. प्रा.अशोक देशमुख यांच्या हस्ते टेंब्ये स्वामी मठ ब्राह्मणवाडी जालगाव येथे करण्यात आले
पुस्तक प्रकाशनाचे पूर्वी प्रा. देशमुख यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी गुरुच्या विविध रूपा बद्दल विवेचन केले. आणि सर्व व्यापी गुरूला नतमस्तक होऊन आत्मज्ञानअनुभवण्या बाबत विवेचन केले.
अशोक परांजपे सर यांचे पुस्तक प्रत्येकाचे संग्रही असावे आणि सोप्या भाषेतून साकारलेले भागवत स्कंध पुराणातील आठ स्कंध समजून घ्यावेत असे आवाहन प्रा. देशमुख यांनी या वेळी केले.
प्रकाशन सोहळ्याकरता श्री टेंबे स्वामी मठाचे संस्थापक मोरेश्वर फाटक, माधुरी फाटक, डॉ.प्रशांत परांजपे, अध्यक्ष अरविंद जोशी, भारदे बुवा, ह.भ.प.स्वानंद आपटे, निलीमा परांजपे आणि सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन किरण पेंडसे गुरुजी यांनी तर ऋणनिर्देश अस्मिता परांजपे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे, उपाध्यक्ष राजेंद्र पतंगे सचिव दत्तात्रय मराठे, खजिनदार श्रुती पटवर्धन आणि कविता मराठे बाई आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
बहुसंख्य भक्तगणांच्या मंगलमय उपस्थिती आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
गुरु विविध रूपात असतो आणि मार्ग दाखवतो त्या सर्वव्यापी गुरूला नतमस्तक व्हा… प्रा. अशोक देशमुख..
