लांजा: (गोविंद चव्हाण)नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) यांच्या वतीने व रिद्धेश कन्स्ट्रक्शन, मुंबई यांच्या पुरस्कृत लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा शनिवार १ ऑगस्ट रोजी भांबेड येथे उत्साहात संपन्न झाली.
लोकमान्य टिळक यांच्या विचारांवर आधारित विषयांवर प्राथमिक, माध्यमिक-उच्च माध्यमिक व खुल्या गटात झालेल्या या स्पर्धेत तालुकाभरातील ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्राथमिक गटात संस्कृती विजय मोहिते, माध्यमिक-उच्च माध्यमिक गटात आश्विनी धोंडीराम झोरे आणि खुल्या गटात श्रृतिक सुशांत प्रभुलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ.राहूल मराठे व डॉ.बी.टी.शिंदे यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाला विविध मान्यवर, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
