चिपळूण – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्या विषयी केलेले अवमानकारक व महिलांचा अपमान करणारे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र कोणत्याही महिला लोकप्रतिनिधीचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर टीका करणारी किंवा अपमानास्पद भाषा वापरणे हे लोकशाही संस्कृतीला शोभणारे नाही. अशा प्रकारची विधाने समाजात चुकीचा संदेश देणारी असून महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिपळूण तालुक्याच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत असून, संबंधितांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी व भविष्यात अशा प्रकारची बेजबाबदार विधाने टाळावीत असे निवेदन देण्यात आले या वेळी चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, जिल्हा परिषद सदस्य नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य स्नेहा साळवी, नगरसेवक योगेश पवार, नगरसेविका शेहनाज वांगडे, महिला अध्यक्ष जागृती शिंदे, माजी नगरसेविका शिवानी पवार, महिला शहर अध्यक्ष आदिती देशपांडे, जिल्हा महिला उपाध्यक्ष रविना गुजर, प्रकाश पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, दिनेश शिंदे, मनोज जाधव, पुर्वा आयरे, पूनम भोजने, विलास महाडिक, भालचंद्र पाचांगने, रघुनाथ भालेकर, पार्थ कदम, सुरेंद्र सुर्वे, राजू शिंदे, संतोष सुतार आदी मान्यवर उपस्थित होते….