चिपळूण : रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली करोडोचा निधी काम न करताच लाटला जात आहे..तीस ते चाळीस टक्के बिलो दराने कामे घेतली जातात ही कामे कशी परवडतात.. जागोजागी खड्डे आणि झाडी दिसत आहेत मग काम अशी कामे कुठे केली गेली ?…ज्या ठेकेदारांनी कामे केली त्याची माहिती आम्हाला मागवावी लागेल… कागदावरची कामे लोकांसमोर आणूच मात्र जर यामुळे अपघात घडला अथवा अपघातमध्ये कोण दगावला तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराची लक्तरे आज वेशीवर टांगण्यात आली …
चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती श्री सूर्यकांत खेतले उपसभापती संदेश आयरे गटविकास अधिकारी सौ उमा घारगे पाटील यांच्या उपस्थित झाली वेळी सदस्य श्री विनोद झगडे,सुभाष जाधव,शौकत माखजंकर, शरद शिगवण,आदि सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर तोफ डागली यावेळी विनोद झगडे यांनी या साऱ्याची पोलखोल करताना एवढ्या बिलोनी ही कामे या ठेकेदारांना परवडत कशी आहेत हाच प्रश्न आहे..यांचे कामाचे रेकॉर्ड मागवावे लागेल आणि मग जर त्या मध्ये घोळ मिळाला तर मग आम्ही गप्प बसणार नाही ज्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत त्याची यादी लवकर द्या अशी मागणी करताना जर कागदावरच खड्डे भरले असतील आणि झाडे तोडली असतील तर मग याद राखा आम्हाला काय करायचे ते माहित असल्याचा इशारा विनोद झगडे,सुभाष जाधव, आदींनी दिला त्याच बरोबर अपघात आणि त्यांमध्ये कोणी दगावल्यास ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..
एसटी महामंडळाच्या कारभारवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली गळक्या बसेसंदर्भात गाड्यांचे नंबर घेऊनच गौरव पाटेकर यांनी या कारभाराची पोलखोल केली आहे यावेळी शौकतभाई माखजनकर यांनी अशा गळक्या बसेसवर कृषी विभागाकडून मिळणाऱ्या ताडपत्री टाकण्यात याव्यात म्हणजे प्रवाशाचा प्रवास सुखकर होईल असे सांगितले पंचायत समितीच्या सदस्यांचे कॉल घेतले जात नाहीत. आमचे फोन जर घेतले जात नसतील तर ही आमची अवहेलना असल्याचे माखजनकर यांनी सांगून या कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली.
भूमिअभिलेख खात्याचे अधिकारी का मीटिंगला येत नाहीत ? आज जर ही पाचवी सभा असतानाही ते येत नाहीत तर प्रश्न मांडायचे कुठे त्यांना जर यायचे असेल तर आम्ही त्याच्याकडे जातो मग काय होते ते बघा असा इशारा विनोद झगडे,सुभाष जाधव,शौकतभाई माखजनकर आदींनी दिला मात्र दुपारच्या सत्रानंतर भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी मीटिंगला हजर झाले यावेळी विनोद झगडे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना थेट समज देताना आम्ही अशा बाबी सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले.
शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभाराची आज विनोद झगडे,सुभाष जाधव,शौकतभाई माखजनकर यांनी चिरफाड केली .कामगिरी काढलेल्या पिंपळी खुर्द येथील शिक्षिका विरोधात गटक्षणाधिकारी यांना धारेवर धरले बोलती बंद झालेल्या संबंधित अधिकाऱ्याची सभापती,गटविकास अधिकारी यांनीही त्यांना समज दिली हाच विषय सुरू असताना कोसंबी घाणेकरवाडी येथील अंगणवाडी बांधकाम जागेसंदर्भात विस्तार अधिकारी यांनी शिक्षकाला नाहक नोटीस काढल्या प्रकरणी संबंधित विस्तार अधिकारी याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या आढावा वेळी सदस्य श्री गौरव पाटेकर यांनी आज अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे कौतुक केले .आज अनेकांना याचा त्रास होत असला तरी करोडो जनतेला मात्र आरोग्याच्या समस्यांपासून दूर करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे धडक कारवाई करणाऱ्या श्री तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना त्याची बदली करू नये त्याच सोबत असे अधिकारी तयार होऊदे अशी अपेक्षा व्यक्त केली हा ठराव मांडताच सदस्य विनोद झगडे यांनी ठरवला. अनुमोदन देताच साऱ्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला .सभापती उपसभापती आणि गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनीही या ठरावाचे कौतुक केले असा ठराव मांडणारी चिपळूण पंचायत समिती राज्यात प्रथम ठरली आहे.