लांजाः लांजा तालुक्यातील बेनी येथील काल रात्री ९ वाजता संतोष सुर्वे,हर्षद सुर्वे यांच्या घराजवळ कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या घरात शिरला कोंबडी ओरडली म्हणून संतोष व हर्षद सुर्वे घरातून बाहेर पडताना संतोष वर बिबट्या हल्ला केला त्याला सोडवण्यासाठी हर्षद गेला असता दोघांवर हल्ला केला दोघांना ही दुखापती झाल्या.त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉ.अभिजित कदम यांनी उपचार केले संतोष सुर्वे यांच्या डोक्याला २१टाके मारण्यात आले.
बिबट्यांची व पटेरीवाघ यांची संख्या लांजा तालुक्यातील अनेक गावा गावात लोकांना आपले दर्शन व्हावे म्हणून वाडीवस्तीवर फिरायला लागलेत.ते पोटाची खलगी भरण्यासाठी फिरत असतात.याची वनखात्याने बंदोबस्त करावा असी नागरिकांची मागणी होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन भाऊ जखमी बेनी येथे घटना…
