आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानातील ठिकाणी आबलोली उपकेंद्र येथून निघणारा 11केव्ही लाईनच्या पोलवर असणारा व्ही क्रॉस आणि वायर तुटली होती. त्यामुळे आबलोली उपकेंद्र येथून निघणारी 11 के व्ही पडवे फिडर लाईन वरील 15 गावे 5 तास अंधारात होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत 15 गावे उजेडात आणली. ग्रामस्थांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
महावितरण आबलोलीचे शाखा अभियंता सुजय निकम यांचे मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रकाश दूत प्रशांत कदम, संजय आग्रे, विशाल भोसले, प्रसाद शिगवण, अनिकेत जाधव, शैलेश वेलुंडे, सागर चव्हाण यांनी अंधाऱ्या रात्री तब्बल 5 तास मेहनत घेऊन 11केव्ही लाईन वरील 15 गावे उजेडात आणली त्यामुळे 4500 ग्राहकांच्या घरी उजेड आणला. या कामी आबलोली येथील ग्रामस्थांनीही विशेष सहकार्य आणि मदत केली. या सर्वांचे आबलोली गावातून कौतुक करण्यात येत आहे.