मुंबई : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकारिणीची यादी मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार मा. श्री. अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आज, ९ एप्रिल २०२६ रोजी, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मा. श्रीमती योजना ठोकळे यांनी जाहीर केली. काही दिवसांपूर्वीच भाजप मुंबईच्या नव्या पदाधिकाऱ्यांची आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली होती. त्यानंतर महिला मोर्चाची यादी अपेक्षित होती. तिची घोषणा आज करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, मुंबईच्या नव्याने जाहीर झालेल्या यादीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मा. श्रीमती कमला पुरोहित, अॅड. ज्योती दुराफे, श्रीमती स्वर्णिका बाली, श्रीमती अनघा चांगले, श्रीमती स्वर्णलक्ष्मी बाला तेवर, श्रीमती उंबरसाडे, श्रीमती रंजना राणे-दास, श्रीमती रंजू झा यांचा समावेश आहे. तर महामंत्रीपदी मा. श्रीमती अंकिता सावे चौधरी, श्रीमती दक्षा पटेल, श्रीमती सारिका पवार, श्रीमती राजवी नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच मंत्री, कोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणाही करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष (भाजप) महिला मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी योजना ठोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना फेब्रुवारी २०२६ मध्ये या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्या मुंबईतील महिला संघटनेचे नेतृत्व करत आहेत.