चिपळूण: येथील पालिकेचे तरुण तडफदार आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दि.२१ व उद्या रविवार दि.२२ मार्च असे दोन दिवस नामदेव शिंपी समाज मंदिर ,महालक्ष्मी नगर बायपास रोड खेंड (चिपळूण) येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर या उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये सीपीए संस्थेचे वरिष्ठ संचालक नीता मोरे, जनरल सर्जन डॉ.सत्येंद्र मेहरा,स्त्रीरोग तज्ञ डॉ. रचना मेहरा, फिजिशियन डॉ. विना मोरे आणि इ एन टी स्पेशालिस्ट डॉ.प्रिया साठे रुग्णांची तपासणी करणार आहेत.या आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी मंगेश खेडकर 9823288860,अभी साळुंखे 88 88 0 20 863, अमोल तटकरे 9921881833 आणि सुयश पेठकर 93 25 54 96 24 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांचा मुख्य वाढदिवस सोहळा २२ मार्च रोजी होणार आहे. महाआरोग्य तपासणी शिबिर आणि वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री वर्षा उसगावकर येणार असून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा रुग्णांनी जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.