दापोली : बँकेचे भागधारक सभासद व ठेवीदार यांनी बँकेवर ठेवलेला दृढ विश्वास आणि त्यामुळेच बँकेची दैदिप्यमान होत असलेली घोडदौड याचा विचार करुन संचालक मंडळाने या घटकांना अधिक सुरक्षित करणेसाठी यापुर्वी सभासद व ठेवीदार यांच्या अपघात विमा रकमेमध्ये वाढ करुन सभासद व ठेवीदारांना दिलेल्या शब्दांची पुर्तता केली आहे.
पुर्वी रु. १ हजार रुपयांचे शेअर्स धारण केलेल्या सभासदाचा बँक रु. २ लाखाचा अपघात विमा उतरवित असे. आता त्यामध्ये वाढ करुन ती मर्यादा रु. ३ लाख करण्यात आली आहे. तसेच ज्या ठेवीदारांच्या ठेवी रु. ५० हजार रुपये व जास्त आहेत अशा ठेवीदारांसाठी पुर्वी बँक रु. ५ लाखाचा अपघात विमा उतरवित असे त्या मयदिमध्ये वाढ करुन ती मर्यादा रु. ७ लाख करण्यात आली आहे. त्यामुळे वरील प्रकारामधील प्रत्येक सभासदांचा बँकेमार्फत रु. १० लाख रुपयांचा अपघात विमा उतरवून त्यांचे कुटूंबियांना सुरक्षित केली असल्याचा निर्णय बँकेचे संचालक मंडळाने घेतला असल्याचे बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी बँकेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. बँकेने राबविलेल्या या योजनेमुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटूंबियांना मदत होत आहे. या निर्णयामुळे बँकेवर रु. ३५ ते ४० लाख रुपयांचा विमा हप्त्याचा बोजा पडणार आहे. परंतु बँकेचे संचालक मंडळ नेहमीच भागधारक सभासद व ठेवीदारांच्या हितास प्राधान्य देत असलेमुळेच सामाजिक बांधीलकेच्या भुमिकेतूनच संचालक मंडळाने हा धाडसी निर्णय घेतल्याचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर सध्या फसवणूकीचे S.M.S., Fishing Mail पाठविणे. तसेच Whatsup, Instagram व facebook यासारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोटी प्रलोभने, ओटीपी नंबर मागणे, धार्मिक भावनांचे माध्यमातून खोटे मेसेज पाठविणे अशा अनेक माध्यमातून जनतेची आर्थिक लुट करणेचे प्रकार घडत आहेत. अशा अनेक प्रकारच्या फ्रॉडच्या चक्रात सापडलेल्या जनतेला या धोक्यापासून त्यांची होणारी फसवणूक टाळणेसाठी जनतेमध्ये जनजागृती करणेचा भाग म्हणून याबाबतचे मार्गदर्शक सुचना असणारे माहितीपत्रक बँकेमार्फत जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, जि.प. शाळा, हायस्कूल, कॉलेज, शासकीय कार्यालयांमध्ये त्याचे वाटप करणार असल्याचे अध्यक्ष जालगावकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ संचालक श्री. माधव शेट्ये, संचालक सी.ए. श्री. संदिप खोचरे, श्री. आशिष मेहता, श्री. अशोक जाधव व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजी थोरात उपस्थित होते.