खेड : तालुक्यातील देवघर व सोंडे या दोन्ही गावांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तेथील गावांची नळपाणी पुरवठा योजना सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत नुकतीच उज्ज्वल भविष्य महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत देवघर व महसूल गांव सोंडे येथे दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडलेल्या या हस्तांतरित सोहळ्यास खेड प्रांताधिकारी श्रीमती वैशाली पाटील , गटविकास अधिकारी गणेश मंडलिक , ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व उज्ज्वल महीला स्वयं सहाय्यता बचत गटातील सहयोगीनी उपस्थित होत्या. या उपक्रमांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे व प्रकल्प संचालक सागर पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले असून सातत्याने पाठपुरावा व ग्रामपंचायत स्तरांवरील संवाद यामुळे हे शक्य झाले आहे. महसुली गाव देवघर व सोंडे या दोन्ही गावांच्या उज्ज्वल भविष्याची दोरी आता उज्ज्वल महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडे सोपविण्यात आल्याने सर्वांनीच या उपक्रमाचे स्वागत करून त्यांच्या हातून या दोन्ही गावांचे भविष्य उज्ज्वल होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.