खेड : – तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील दिपक नोव्हाकेम कंपनीच्या आवारातुन २ लाख ५४ हजार ९५० रुपये किंमतीच्या लोखंडी वजन मापांची धाडसी चोरी करण्यात आली आहे. हि घटना २५ मार्च २०२६ ते २ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजताच्या मुदतीत घडली आहे. अमोल आनंद अकुलकर ( ४५, रा. चिपळूण) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दि.२३ एप्रिल २०२६ रोजी संशयित आरोपी संजय सितापराव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ., आयशर टेम्पो क्रमांक एमएच ०६ – बीडब्लू ३०८९ मधून १,८७,५००/- रु. किंमतीची षटकोनी आकाराचे २० किलो वजनाची एकूण तीन हजार किलो वजनाची दि. २०/०६/२०१७ रोजी विकत घेतलेली एकूण १५० लोखंडी वजन मापे तसेच ६७,४५०/- रु. किंमतीची षटकोनी आकाराची २० किलो वजनाची १४२० किलो वजनाची दि.३१ ऑगस्ट २०१० रोजी विकत घेतलेली एकूण ७१ वजन मापे अशी एकूण २ लाख ५४ हजार ९५०/- किंमतीची लोखंडी वजन मापे टेम्पोच्या केबीनमधुन चोरून नेत असताना कंपनीच्या सीसीटिव्हिच्या कॅमेरातुन निष्पन्न झाले. म्हणून संशयित आरोपी संजय सितापराव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.