गुहागर : सामाजिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष डॉक्टर निलेश सांबरे यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गॉगल येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला .

या कार्यक्रमाला भागात नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे अध्यक्ष पत्रकार पराग कांबळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळवंत, डॉक्टर चंदनशिवे, एडवोकेट प्रसाद जांगळी, तेज सोशल फाउंडेशनचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय हळये , शिवसेनेचे तालुका प्रवक्ते संतोष आग्रे , सामाजिक कार्यकर्ते किशोर भागडे, अनिल घुमे, बालुकाका बेंडल यांचे सह जिल्हा स्पर्धा परीक्षा हो पोलीस भरती अकॅडमी चे विद्यार्थी यात सोबती जाऊन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

डॉक्टर निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या एडवोकेट प्रसाद जांगळी यांनी जिजाऊ संस्थेच्या बाबत आणि विविध उपक्रमाबाबत उपस्थित मान्यवरांना व रुग्णांना माहिती दिली डॉक्टर निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप करण्यात आले सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सामाजिक संस्था जिजाऊ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले