चिपळूण : एक राखी देशासाठी एक राखी भारतीय सेवेसाठी चिपळूण मधील आलोर शिरगाव पोलिस ठाणे,चिपळूण एस.टी.डेपो,कोकण रेल्वे चिपळूण याठिकाणी दिवस रात्र कर्तव्य बजावत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रति आदर व आपलुकीची भावना व्यक्त कारणासाठी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रूपमधील बहिणींनी बांधल्या 225 राख्या.
देशातील अनेक जिल्ह्यातून अधिकारी व कर्मचारी हे आपल्या जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असतात त्यांना सुद्धा आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही त्यांना राखी बांधून भावा बहिणीचे प्रेमाचे बंधन घट्ट रहावे त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीची आठवण आली तरी याच विचाराने प्रेरित समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रूप त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहेत.आलोर, शिरगांव पोलिस ठाणे वरिष्ठ अधिकारी प्रशांत आवारे, चिपळूण एस.टी.डेपो मॅनेजर रणजीत राजशिर्के,कोकण पर्यवेक्षक क्षेत्रीय रेल्वे चिपळूण
याठिकाणी जाऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप तर्फे रक्षाबंधनाचा उपक्रम प्रत्येक कार्यालयात उत्साहात साजरा केला. कर्तव्याची जाणीव ठेवत त्यांच्या कष्टाचा गौरव व्हावा त्यांच्या प्रति अभिनंदन पत्र देण्यात आले. उपक्रमाचे नियोजन करण्यात आले कर्तव्यात व्यस्त असणाऱ्या पोलिस, वाहक,चालक,रेल्वे अधिकारी
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
राखी बांधून झाल्यानंतर सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. समाजसेवेचा अनोखा आदर्श मुख्यप्रवर्तक विनेश भाऊ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विकास ग्रुप नेहमीच विविध सामाजिक आणि शैक्षणीक उपक्रम राबवत असतो. या सर्व कर्मचारी व अधिकारी बांधवांसाठी वेळ काढणे आणि त्यांना कुटुंबाची कमतरता भासू न देणे हे आपले कर्तव्य आहे. अशी यावेळी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी भावना व्यक्त केली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक संभाजी चव्हाण,सुनील खरात, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर,विजय खरात,राजेश कोकरे,साद कडवेकर, जितेंद्र कांबळे,ओंकार उदेग,सामाजिक सेवक प्रसाद वनगे,सुधीर मोरे,नितीन शिगवण,वैभव मोहिते,विवेक जाधव,अजय कडव,समीर कदम,साहिल तांबे,राहुल कदम,विशाल तु.मोहिते,अनिल पिनगे,उद्योजक हेमंत जाधव,मनोहर मोहिते,दैवत मोहिते,जयश्री जाधव,सुचिता तांबे,सुहानी मोहिते, उपस्थित होते. उपक्रमाबद्दल संपूर्ण टीमचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. सूत्रसंचालन सचिन पवार सर तर उत्तम फोटोग्राफी आकाश मोहिते यांनी केले.
