मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 25 विभागांतर्गत स्वच्छते बाबत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेतील भाग घेणार्या सर्वंकष स्वच्छ उत्तम ब्लकवेस्ट जनरेटर, व्हल्रनेबल स्पाॅट, शाळा काॅलेज, हाॅस्पीटल व्यापारी संकुल, हाॅटेल अशी निवड करुन
प्रथम द्वितीय,आणि तृतीय क्रमांक काढुन त्याना लाखोंची बक्षीस देण्याचे योजिले आहे. ही स्पर्धा 25 विभागात 1एप्रिल 2026 पासुन सुरु होणार आहे.
या स्पर्धेची पुर्व तयारी म्हणुन दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी जी-उत्तर विभागात कार्यंशाळा आयोजित करण्यात आली होती,
या स्पर्धेची सखोल माहीती तसेच अटी नियम आदी बाबत माहीती सहाय्यक अभियंते,श्री किरण सिंग पाटील,व श्री निलेश भोईर यांनी उपस्थितांना दिली.तसेच सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत, श्री राजेश भावसार आणि पर्यवेक्षक श्री धुरु यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त कर्मचारीवर्ग यांनी सहभाग घेवुन सर्वाधिक बक्षीस जी उत्तर विभागात मिळावी या दृष्टिकोनातून पूर्वंतयारी व नागरिक व संबधीतांना सहभागी करुन घेणे असे सर्व उपस्थित कर्मचारीवर्ग वृंदाना आवाहन केले.
या कार्यशाळेत प्रामुख्याने मुकादम,क.पर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यशाळा संपतेशेवटी समुप श्री रत्नकांत सावंत यांनी सर्वांचे आभार मानून या स्पर्धे कामी उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या.