चिपळूण – लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांमुळे नावाजलेल्या चिपळूणच्या प्रभात रोड फाऊंडेशनतर्फे चिपळूणच्या विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. वनाधिकारी देसाई यांचा राज्य सरकारने उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदक देऊन सन्मान केल्याबद्दल प्रभात रोड फाऊंडेशन त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी प्रभात रोड फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश काटकर, उपाध्यक्ष सुमती जांभेकर, सचिव संतोष इनामदार,विश्वस्त शर्मिला मोरे, स्मिता सरदेसाई, प्रमोद शेठ लाड, संजय आवटे, धनश्री जोशी, संपदा लाड, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी, सभापती कपिल शिर्के, उज्वला सावंत,सुप्रिया जाधव,गीता बडवे,सल्लागार कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
फाऊंडेशनचे सचिव संतोष इनामदार यांनी संस्थेच्या बहुविध उपक्रमांची माहिती दिली. या सत्कार बद्दल विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी प्रभात रोड फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले . देसाई मॅडम यांनी आता पर्यंत २०० वन्य प्राण्यांचे प्राण वाचविले असून ३० हून अधिक बिबट्यांची सुखरूप सुटका केली आहे. वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. वन्य प्राण्यांविषयी त्यांनी जनजागृती अभियान ही राबविले.
विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांचा प्रभात रोड फाऊंडेशन तर्फे सत्कार
