मुंबई : आज दिनांक 24/03/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता गोखले रोड (दोन्ही बाजू) सेना भवन ते जाखादेवी चौक या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत घनकचरा खात्यातील चैत्यभूमी सेक्शन, वीर कोतवाल गार्डन सेक्शन आणि डॉ. आगाशे पथ सेक्शन या चौक्यांमधून प्रत्येकी 20 असे एकूण 60 कामगार, 6 मुकादम, तीन सेक्शन जे.एस. व दोन एम.एल.जे.एस. यांनी सहभाग घेऊन स्वीपिंग व ब्रशिंग करून विभाग स्वच्छ करण्यात आला.

झाडलोट केलेला रस्ता संपूर्णपणे वॉटर टँकरने धुवून घेण्यात आला.

या स्वच्छता अभियानात नगरसेवक मा. यशवंत किल्लेदार यांनी व नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला तसेच साफसफाईच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.