रत्नागिरी : जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनुज जिंदाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री राजकुमार जैन, संचालक श्री शिरीष चौधरी, श्री राजेश तिवारी, खेडच्या उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री अ. आजगेकर, नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल त्यागी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.