मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुंबळे येथे आयोजित तालुकास्तरीय पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे मंडणगड परिसरातून अभिनंदन होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक तालुकास्तरीय मैदानी खेळामध्ये कु. सायली भुवड – इयत्ता 11वी वाणिज्य – 100 मीटर हर्डल्स धावने प्रथम व 800 मीटर धावणे व्दितीय क्रमांक, ऋषिकेश पोस्टूरे इयत्ता 11वी वाणिज्य – 200 मीटर धावणे व्दितीय, आकाश नेमाणे – इयत्ता 12वी विज्ञान – 400 मीटर धावणे व्दितीय, कु. साई पाटील – इयत्ता 12वी वाणिज्य – लांब उडी व्दितीय क्रमांक, कु. प्रिया पवार – इयत्ता 11वी वाणिज्य – 1500 मीटर धावणे व्दितीय क्रमांक, कु. निधी भारदे – इयत्ता 11वी वाणिज्य -100 मी धावणे तृतीय क्रमांक अशा या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुयश प्राप्त केले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक प्रा. साई पवार, प्रा. प्राची कदम यांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री.श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये क्रीडा विभागप्रमुख प्रा. साई पवार, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. प्राची कदम सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्मवीर इदाते महाविद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये सुयश…
