खेड (प्रतिनिधी) : – स्वतंत्र व निष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी साजरा केला जाणारा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्यदिन यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दि. ४ मे २०२६ रोजी खेड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सन्मानित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयचे आभार मानले. कार्यक्रमास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ब्रह्माकुमारी गीता बहेन तसेच विद्यालयातील सर्व ब्रह्मवृंदानी केले होते.