चिपळूण: संसदेत मांडलेल्या आणि नामंजूर झालेल्या महिला आरक्षणासह इतर विधेयकांमागील वास्तव यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुरूवार, दि. २३ एप्रिल २०२६, सकाळी ११.०० वा. अतिथी हॉल, चिपळूण येथे पत्रकार तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ,विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

देशाच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या विषयावरील पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी देशाचे एक नागरिक या नात्याने उपस्थित राहून पत्रकारांबरोबर या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.