चिपळूण : धामणदेवी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार शेखर निकम प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेचे अध्यक्ष डॉ. राघव अष्टेकर, कायदेशीर सल्लागार श्री. नरेंद्र कुलकर्णी, भिडे फाऊंडेशन पुणेचे संचालक श्री. दुरापे सर, एस. पी. एम. स्कूल परशुरामच्या मुख्याध्यापिका खाडिलकर मॅडम, शिक्षक, कर्मचारीवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासह पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने करण्यात आले.