दापोली:-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता “ या अभियानाअंतर्गत दापोली तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा व प्रमाणपत्रांचा लाभ मिळण्यासाठी “ विमुक्त जाती व भटक्या जमाती हक्क व प्रमाणपत्र अभियान“ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी वाकवली मंडळामध्ये “ वाकवली ग्रामपंचायत कार्यालय” येथे संपन्न झाले.

राज्यमंत्री नाम.योगेशदादा कदम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल,उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी दापोली पंचायत समिती सदस्य निलेश शेठ यांचे मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार अर्चना बोंबे,दापोली, अशासकीय सदस्य जिल्हास्तरीय समिती जिल्हा रत्नागिरी (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, रत्नागिरी चे श्री. मुरलीधर दाजी यदमळ व अनुलोम संस्था दापोली भागजनसेवक कु. वेदांग मंगेश शितुत यांचे उपस्थितीत पार पडले.

सदर शिबिरास मोठ्या प्रमाणात वाकवली, दापोली व देगाव मंडळातील विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या बांधवानी उपस्थिती लावून शिबिराचा लाभ घेतला.