देवरुख : माखजन महसूल मंडळात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वितरण अभियान ग्रामपंचायत कार्यालय, धामापूर तर्फे संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते .
माखजन महसूल मंडळातील भटके-विमुक्त बांधवांना विविध शासकीय सेवा, योजना तसेच आवश्यक प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. अभियानाच्या माध्यमातून आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, वारस तपास, ई-पीक पाहणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना तसेच विवाह नोंदणी आदी सेवांबाबत अर्ज नोंदणी, मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
या अभियानास जिल्हा परिषद सदस्य सुशिल भायजे, तसेच माखजन मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, आदी उपस्थित होते