चिपळूण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या चिपळूण नगरीतील गांधारेश्वर येथील गांधी समाधीस्थळ हे गांधीप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि त्यांची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या मार्फत
जी दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
याच उपक्रमांतर्गत यावर्षी जिल्हास्तरीय गांधीविचार निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंधाचा विषय होता आजचे जग आणि गांधीजी. निबंध स्पर्धेमध्ये आलेल्या 450 निबंधातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. आणि यामध्ये खुल्या गटात दलवाई हायस्कूल, मिरजोळीच्या विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला. गांधीविचारांवरील प्रभावी मांडणी आणि आशयपूर्ण लेखनातून त्यांनी हे उल्लेखनीय यश मिळविले.
शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गांधारेश्वर येथील गांधी समाधीसमोर आयोजित कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले. यावेळी मा. आमदार श्री. शेखर निकम, मा. माजी आमदार श्री. रमेशभाई कदम,कोकणचे कलामहर्षी मा. श्री. प्रकाश राजेशिर्के,श्री.जयंद्रथ खताते,गांधी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. विनायक होमकळस, श्रीमती सई वरवाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत दलवाई हायस्कूल, मिरजोळीच्या सौ. रागिनी पराग आरेकर आरेकर यांचा द्वितीय क्रमांक
