मंडणगड : येथील यशेतज फाउंडेशन या सामाजीक संस्थेच्यावतीने 25 ऑक्टोंबर 2026 रोजी ‘सखी अभियानातून’ तालुक्यातील पालघरवाडी येथे महिला सक्षमीकरणाचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास वाडीमधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामिण भागातील महिलांचा; आत्मविश्वास, आर्थिक साक्षरता आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचे उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा सर्वांगीण विकास साधून त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करणे या उद्देशाने यशतेज फाउंडेशन ‘सखी अभियानाचे माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये ज्ञान, जागरूकता, संवादकौशल्य आणि आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवित आहेत.
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचून महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणे महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाल्यास गावाचा विकास होतो आणि गावांचा विकास झाल्यास देशाची प्रगती अधिक बळकट होते, या विचारातून फाउंडेशनचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला स्वतःमधील क्षमता ओळखता यावी, प्रत्येक मुलीला प्रगतीची संधी मिळावी आणि समाजासाठी योगदान देणारी सक्षम पिढी घडावी, यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यशतेज फाउंडेशनचे समर्पित कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे अभियान पुढे नेत आहेत. अधिकाधिक गावांतील महिला, वाड्या-वस्त्यांमधील महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा फाउंडेशनचा मानस असल्याचे अध्यक्ष अँड. यश घोसाळकर यांनी सांगीतले.यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.महिला सक्षमीकरणाचा हा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नसून महिलांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारा प्रयत्न आहे. आपल्या गावातही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, तसेच यशतेज फाउंडेशनच्या सखी अभियानात सहभागी होऊन सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन यावेळी केले. ‘जय जिजाऊ! जय शिवराय!’ या प्रेरणादायी घोषणेसह महिला सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि सक्षम भारताच्या निर्मितीचा संदेश या अभियानातून देण्यात आला या कार्यक्रमास अँड. यश घोसाळकर, स्नेहज्योतील अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, माजी सरपंच प्रणिता जंगम अनंत घाणेकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. स्नेहज्योती अंध विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण करुन महिलांना प्रोत्साहीत केले.
