खेड – सहकार महर्षी आणि सर्व सामान्यांच्या सुख- दु:खात सातत्याने पाठीमागे उभे राहणा-या श्री देशानेमा मुरली मनोहर मंडळ श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष व मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री संजय मोदी यांच्या वाढदिवशी गुजर समाज बांधवांसह राजकीय, सामाजिक, सहकार, आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांसह हजारो हितचिंतकांनी शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या शुभेच्छांच्या वर्षावाने ते भारावून गेले.
श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, महिला आण कामगार वर्गाला आर्थिक स्थैर्य मिळवुन देण्याचे मोठे कार्य केले आहे. ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि आर्थिक सुबत्ता या त्रिसुत्रीवर त्यांनी पतसंस्थेचा विस्तार केला असून आज ही पतसंस्था अग्रगण्य व विश्वसनीय संस्था म्हणून नावारूपास आली आहे. केवळ सहकार क्षेत्रच नव्हेतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही मोदी यांचे योगदान मोलाचे आहे.गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी त्यांनी नेहमीच आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले आहे. शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून पिढी घडवण्याचे पवित्र कार्य ते अविरतपणे करत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांचे निवासस्थानी व श्रीकृष्ण मंदिरात सकाळ पासूनच शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली होती. विविध क्षेत्रातील दिग्गज नेते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला. नगराध्यक्ष माधवी बुटाला उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ उपेंद्र तलाठी, श्रीमान चंदुलालशेठ हायस्कूल प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, मिनार चिखले, आरिफ मुल्लाजी, यांनीही अभिष्टचिंतन केले. मे संजय दत्तात्रय दांडेकर ज्वेलर्सचे संजय दांडेकर, निकेत काणेकर, अभय तलाठी, शैलेश सुरा, शेखर तलाठी, कौशल जाडकर, ॲड सिध्देश बुटाला, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, दिपक लढ्ढा, आदित्य गांधी, उद्योजक विलासभाई बुटाला, मंगेशभाई बुटाला, शैलेश मेहता, अल्ताफ मापकर, अजित बुटाला, डाॅ वरुण मोदी, मिलिंद तलाठी, अजय धारीया, जयंता शेठ, प्रमोद बुटाला, संकेत बुटाला, सुहास देसाई, ओमकार सावंत, रविंद्र मेहता, संदीप सावंत यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.