खेड :- येथील खेड तालुका सहकारी फेडरेशन मर्यादित खेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सेवा संकल्प अभियान अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड व खेड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील आसोंड गावातील संत गाडगेबाबा महाराज आश्रय शाळेतील विद्यार्थ्यांना किराणा माल व जीवनावश्यक वस्तूंची भेट कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्री संदिप तांबे, खेड तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. वसंत पिंपळकर, कार्याध्यक्ष श्री अभिनय महाजन, उपाध्यक्ष श्री संदीप मोदी, सदस्या सौ. श्रावणी आंबेडे, सौ. स्नेहा हळदे, श्री. दिनेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था, असोंड, तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
संत गाडगेबाबा महाराज आश्रय शाळेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा किराणा माल देऊन मुलांच्या जडणघडणीत वाढ, आणि विकासात पोषणाचा महत्त्वाचा वाटा असतो. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी भावी पिढी सुदृढ असणे आवश्यक आहे. तरच पुढची पिढी सक्षम घडेल. ही आमची सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. असे पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधन करताना तालुका सहाय्यक निबंधक सौ. योगिता मुरडे यांनी आपले विचार मांडले.
आश्रम शाळेचे अधिक्षक श्री. संतोष हांडे यांनी आश्रम शाळेच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालय व पतसंस्था फेडरेशन यांचे आभार मानले.