खोपोली: ऐन दिवाळीत वृद्ध महिलेचा खून करून पसार झालेल्या यश थापा ( 21) या आरोपीस रायगड पोलिसांनी गजाड केल्याने पोलिसांवर अभिनंदनचा वर्षा होत आहे. ज्येष्ठ नागरिकाचा खून झाल्याने खोपोली व परिसरात खळबळ माजली होती. यामुळे ज्येष्ठ नागरिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
खोपोली शहरातील इंद्रप्रस्थ बिल्डिंग मधील रूम नंबर चार मध्ये अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने महेश्वरी रामचंद्रन pannikar (71) या महिलेचा हातपाय बांधून तिचा निर्गुण खून करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील तीन सोन्याच्या बांगड्या जबरीने चोरून नेले होते या घटनेने संपूर्ण खोपोली शहरात खळबळ माजली होती. याबाबत खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती
.
या प्रकरणाच्या तपासासाठी प्रारंभी अलिबागच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने खोपोली पोलिसांना मदतीला धावून आले होते. श्वान पथक, ठसेतज्ञ इत्यादींनी घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल सीडीएस द्वारे जलद वेगाने तपासाची चक्र फिरली गुन्हा घडल्यानंतर आरोपी मित्रासह गोवा येथे फिरायला गेला होता तांत्रिक बाबीचा आधार घेत आरोपीस गोव्याहून खोपोली ते आणण्यात आले.
आरोपींनी सोन्याचे दागिने विकलेल्या व्यापारासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एकूण दोन जण पोलीस कसोटीत असल्याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली
रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागाई पोलीस अधिकारी डॉक्टर राहुल तसेच गुन्हा अन्वेषण खात्याचे , खोपडे व त्यांचे सर्व सहकारी पथक ,खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन अहिरे व त्यांचे सर्व सहकारी पथक यांनी अहोरात्र ऐन दिवाळीत या प्रकरणाचा तपास करून अखेर आरोपींच्या मुस्क्या आवडल्या. पोलिसांनी तत्परतेने या खुनाचा तपास लावल्यानंतर अनेक नागरिकांनी खोपोली पोलिसांचे त्याचप्रमाणे रायगड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.