चिपळूण : शहरातील जनतेच्या निरामय आरोग्यासाठी आणि शहर स्वच्छतेसाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आरोग्य सभापती श्री शुभम पिसे यांनी वाढदिवस महोत्सवात हितचिंतकांच्या सदिच्छा स्वीकारताना दिली.

सभापती श्री. पिसे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या दणक्यात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आरोग्य तपासणी महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून ४६५ रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये चिपळूण पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. या अभिनव उपक्रमाबद्दल अनेकांनी श्री.पिसे यांचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीसाठी सुयश चिंतिले.

श्री. पिसे यांच्या वाढदिवस महोत्सवासाठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची खास उपस्थिती लाभली. सभापती पिसेंना त्यांनी शुभेच्छा देताना वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरासारख्या उपक्रमाचेही कौतुक केले.

त्याचप्रमाणे आमदार श्री. शेखर निकम, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष श्री सतीश मोरे, विनोद भुरण, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी, स्वानंद रानडे,अमित सावर्डेकर उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, वैशालीताई निमकर,शीतल रानडे , फैसल कासकर, संदीप भिसे,बीआशिष खातू, सारिका भावे, विजय चितळे, पल्लवी महाडिक, अंकुश आवले यांच्यासह,अर्बन बँक संचालक समीर टाकळे, दीपाशेठ देवळेकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिषेक जागुष्टे, सर्वेश सुर्वे, अभिषेक साळुंखे, अमोल तटकरे, मंगेश खेडेकर, सिद्धार्थ पिसे, ॲड. अथर्व पिसे,अभिषेक पिसे, ईशान पिसे यांनी परिश्रम घेतले.