मंडणगड : शेनाळे येथील अंगणवाडी केंद्रात भाजपा सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील स्तनदा मातांनी अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांबाबत आपले मनोगत व्यक्त करून शासनाचे आभार मानले.
या अभियानांतर्गत भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. श्रेया दळवी, तालुका महिला मोर्चा सरचिटणीस तथा स्वराज डेअरी फार्म्सच्या संस्थापक सौ. भार्वी दळवी आणि महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. सिया विनेश साळवी यांच्या हस्ते अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बॉक्स व खाऊचे वाटप करण्यात आले.
तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या संगोपन व विकासासाठी सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा सेवायोगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, बालकांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि समाजातील विविध घटकांपर्यंत सेवाभावी उपक्रम पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.
शेनाळे अंगणवाडी केंद्रात भाजपा सेवा संकल्प्रतिनिधी उत्साहात…
