खेड : – येथील नगरपरिषद हद्दीतील पाटीदार भवन या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी गटाराचे काम करण्यात यावे,अशी मागणी या विभागातील नागरिकांनी केली आहे.
गृहराज्यमंत्री ना.रस्त्याच्या ४ कोटी ३२ लाख ५५ हजार रुपये खर्चाच्या डांबरीकरणाच्या कामाचा भुमिपुजन सोहोळा गृह राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचे हस्ते आणि नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. त्यामुळे गुलमोहर पार्क भागातील रस्त्याची झालेली दुरावस्था दुर होऊन, येथील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होणार आहे. निवडणूकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता प्रत्यक्षात डांबरीकरणाच्या कामाने होणार आहे. त्यामुळेच ना. योगेश रामदास कदम, नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, स्थानिक नगरसेवक आणि विद्यमान बांधकाम समिती सभापती सुनिल दरेकर यांच्यासह सर्वच नगरसेवक/नगरसेविकांना नागरिक धन्यवाद देत आहेत.
खेड गुलमोहरपार्क येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यापुर्वी गटाराचे काम करा. नागरिकांची मागणी
