चिपळूण : तालुक्यातील खेड विकासवाडी रोडवरील आठवडा बाजार मैदानाजवळ शनिवारी रात्री झालेल्या मोटार अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले असून बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दि. 7 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास खेड विकासवाडी रोडलगत असलेल्या आठवडा बाजार मैदान परिसरात घडला. रोहित संजय आगरे (वय 31, रा. दिंडोशी, गोरेगाव पूर्व, मुंबई) हा त्याच्या ताब्यातील एमएच 47 एजी 7369 क्रमांकाची ईर्टिगा कार निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवत होता.
दरम्यान, त्याने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने मैदानात उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर एमएच 08 बीके 0393 या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी विनोद प्रकाश झगडे (वय 48, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. अलोरे बाजारपेठ) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात दि. 8 मार्च रोजी दुपारी 12 मोटार वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75