लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा शहरातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग, रत्नागिरी शाखा, लांजा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. भगवान महादेव सांबरे रुग्णालय, रत्नागिरी यांच्या वतीने हे शिबिर भरविण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, लांजा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. दोन डॉक्टरांनी १७८ रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात दोन डॉक्टरांनी एकूण १७८ रुग्णांची तपासणी केली. विविध आजारांवर उपचार करण्यात आले. १५० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. लांजा शाखेचे अध्यक्ष योगेश पांचाळ, केदार चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
