चिपळूण : महालक्ष्मी महिला मंडळ खेंड यांनी महिला दिनाच्या निमित्ताने धामणवणे येथील पूर्वांचल विकास प्रकल्प रेणुका माता विद्यार्थिनी छात्रावास ला भेट दिली.
मंडळातर्फे दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने एका संस्थेला भेट देण्यात येते, यावर्षी रेणुका माता विद्यार्थिनी छात्रावास ला भेट दिली. यावेळी तिथे कार्यरत असणाऱ्या वृषाली खेर आणि मानसी केतकर यांच्याकडून छात्रावासातील विद्यार्थिनींची माहिती घेण्यात आली. त्यांचे दैनंदिन रुटीन, त्यांचे शिक्षण, त्यांच्या राज्या, विषयी माहिती इ. माहिती खेर मॅडमनी अतिशय छान पद्धतीने सांगितली त्यामुळे या छात्रावासातील मुलींना समजावून घेण्यासाठी फार मदत झाली.
मंडळातर्फे मुलींना काही भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांच्यासाठी मंडळाने एक गेम घेण्यात आला या गेम मध्ये या विद्यार्थिनी खूप हौशीने सामील झाल्या होत्या, मुलींनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या गेम मधून तीन नंबर काढून त्यांना बक्षीस दिली आणि बाकी सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा गिफ्ट देण्यात आले. मुलींबरोबर गेम मध्ये मंडळातील पण सर्व मैत्रिणी सामील झाल्या, त्यामुळे मुलींना खूप आपुलकी वाटली.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळातील आजी-माजी अध्यक्ष कमिटी मेंबर आणि सभासदांनी उत्तम सहकार्य केले.
चिपळूणच्या खेंड महालक्ष्मी महिला मंडळाची रेणुका माता विद्यार्थिनी छात्रावासला भेट..
