मंडणगड : मंडणगड व दापोली तालुक्यात बांबू लागवडीचा विस्तार करून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि रोजगारनिर्मिती करण्याबाबत राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्याशी भावेश कारेकर व मयुरेश जालगावकर यांनी चर्चा केली.
या वेळी विशेष कार्य अधिकारी डॉ. अजित थोरबोले उपस्थित होते. भावेश कारेकर यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू राज्यमंत्री कदम यांना भेट दिल्या.
बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतात, अशी भूमिका कारेकर यांनी मांडली.
तसेच मंडणगडमध्ये Bio-Energy क्षेत्रात प्रकल्प उभारण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या विषयावर राज्यमंत्री कदम यांनी सकारात्मक मार्गदर्शन केले.
