मुंबई : पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०१व्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उपनगरात सभा व भव्य ईद-ए-मिलाद-उन-नबी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

सेंट्रल ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही मिरवणूक उत्साहात पार पडली. मिरवणुकीचे नेतृत्व मौलाना सय्यद झियाउद्दीन नक्शबंदी साहेब यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पवन खेरा खासदार व मुख्य प्रवक्ते, AICC, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू श्री. तुषार गांधीजी यांच्यासह विविध राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या मिरवणुकीच्या माध्यमातून पैगंबर मोहम्मद साहेब यांनी दिलेल्या शांतता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आले.