मंडणगड : वाल्मिकीनगर कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने कोळी बांधवांना शुभेच्छा देत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, पत्रकार उमेश तबीब व भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी कोळी समाजाच्या समृद्ध परंपरेचे आणि समुद्राशी असलेल्या अतूट नात्याचे कौतुक करण्यात आले.
नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य व व्यवसायातील भरभराटीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी वाल्मिकीनगरचे उपसरपंच विश्वजीत पाटील यांच्यासह केशव चोगले, नारायण रघुवीर, प्रभाकर तबीब, देवेंद्र पाटील, दिनेश पावशे, भारत तबीब, गणेश तबीब, लक्ष्मीकांत पाटील तसेच मोठ्या संख्येने कोळी बांधव व महिलावर्ग उपस्थित होते