मंडणगड : वाल्मिकीनगर येथील कोळी समाजबांधव तसेच ‘महाराष्ट्र न्यूज’चे संपादक व विविध वृत्तपत्रांचे मंडणगड तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार उमेश तबीब यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तबीब यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न, सामाजिक समस्या व स्थानिक घडामोडींना सातत्याने प्रसिद्धी देत समाजाचा आवाज प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर, उपसरपंच विश्वजीत पाटील यांच्यासह कोळी समाजबांधव व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार उमेश तबीब यांचा नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष सत्कार..
