चिपळूण ः कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त संस्कृत शिक्षणाचा प्रसार, शिक्षकांचे संघटन आणि संस्कृतप्रेमी समाजनिर्मितीसाठी सातत्याने व सक्रिय कार्यरत असण्यासाठी रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळीचा कृतज्ञतापत्र व स्मरणिका देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या सबल नसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच भागात व्यावसायिक उच्च शिक्षण मिळावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्था नेहमी प्रयत्नशील असते. तसेच 100 टक्के नोकरीची हमी अशा अनेक उपक्रमामुळे हा सन्मान करण्यात आला.
यावेळी रिगल कॉलेजतर्फे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य व रत्नागिरी उपकेंद्राचे प्रमुख दिनकर मराठे यांना रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या व काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या निवडक कोकणी रेसिपींचे रेसिपीबुक भेट देण्यात आले. याप्रसंगी रिगल कॉलेज, श्रुंगारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक मार्फत रिगल कॉलेज शृंगारतळीचा विशेष सन्मान..
