जळगाव:- आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर ९९३ रुपयांनी महागला आहे. यावरून निवडणुका झाल्या, आता सरकारकडून खर्चाची वसूली सुरू झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर ९९३ रुपयांनी महागला आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत तब्बल १३८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. फक्त ३ महिन्यांत तब्बल ८१% वाढ करण्यात आली आहे.
आता पुढचं टार्गेट पेट्रोल-डिझेलची दरवाढ… घ्या अच्छे दिन !