पेण (प्रशांत पोतदार) : पेणमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला.
शुक्रवार २० मार्च २०२६, चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनानिमित्ताने अक्कलकोटसह जगभरातील स्वामी केंद्रांमध्ये पालखी सोहळा,अभिषेक,अन्नदान आणि भजनांचे आयोजन करण्यात आले.
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना निमित्त घरात, मंदिरात पूजा-अर्चा, नामस्मरण,आणि पारायण करण्यात आले. तर स्वामींना ‘पुरणपोळी’ आणि ‘पिठलं-भाकरी’ अत्यंत प्रिय असल्याने नैवद्य करण्यात येऊन महाप्रसाद ठेवण्यात आला होता.
श्री स्वामी भक्तांनी पेण सावरसई येथील प्रसिद्ध श्री स्वामी मंदिरात जाऊन तसेच घर,परिसरातील मंदिरातील स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला, पेण शहरातील स्वामी भक्त निखिल वेदक यांच्या घरी ही श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला.
