रोहा ( अल्ताफ चोरडेकर) : काँग्रेस आय कमिटीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे झुंजार नेतृत्व राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांची दक्षिण रायगड जिल्हा काँगेस कमिटी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जिल्हा काँगेस आय पक्षाला बळकटी देण्यासाठी राजाभाऊंसारख्या निष्ठावंत,कष्टाळू आणि होतकरू नेत्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची मोठी जबादारी सोपविल्याने काँगेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मागील नगर पालिका,नगर पंचायत,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण दक्षिण जिल्हा पिंजून काढत कठीण परिस्थितीत पक्षाची ताकद वाढवली आणि सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचा काम केलं आहे.त्यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर महत्वाची जबादारी सोपवली.त्यांच्या निवडीने जिल्हा काँगेस पक्षाला सोनियाचे दिन येणार असा विश्वास काँग्रेस आय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या निवडीनंतर पोलादपूर,महाड,श्रीवर्धन , म्हसळा,माणगाव,रोहा, अलिबाग,पाली-सुधागड या तालुक्यातील काँग्रेस आय पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले असून भविष्यात दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेऊन पक्ष संघटना मजबुत करणार असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली .