मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे रविवार दिनांक 7 जून रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सोमवार दिनांक 8 जून रोजी दुपारी ३ वाजता नालंदा सोसायटी मुकुंद नगर धारावी येथील राहत्या घरापासून निघून सायन स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांना देशभरातील लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. येत्या दिनांक 15 जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांची जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली .
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री दिवंगत जनाबाई देवाना कासारे यांच्या अंत्ययात्रेत भदंत शांतीरत्न; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे ,अक्षय आंबेडकर, माजी आमदार बाबुराव माने;बाळासाहेब गरुड ; अशाताई लांडगे; भास्कर वाघमारे; तानसेन ननावरे; मिलिंद सुर्वे; सागर संसारे; रमेश जाधव; श्रीकांत भालेराव; सोहेल शेख; जीवन जाधव; आली चौधरी; भगवान धनराज; गंगावणे; अमित तांबे; भीमराव सावतकर; मारीभाई ; आदी अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित होते.