रत्नागिरी : पालघर जिल्ह्यातील विरार येथे पार पडलेल्या ५३व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्ष क्रीडा मंडळाचा खेळाडू शैलेश येडगे याची महाराष्ट्र राज्याच्या कुमार गट कबड्डी संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत निवड झाली आहे. त्याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या निवड शिबिरासाठी निवड झाल्याने संघर्ष क्रीडा मंडळात आनंदाचे वातावरण आहे.
या निवडीबद्दल संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने शैलेश येडगे याचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे पदाधिकारी, माजी कार्यकारिणी सदस्य, माजी खेळाडू तसेच सध्या मंडळाकडून खेळणारे सर्व खेळाडू उपस्थित होते.
उपस्थितांनी शैलेशच्या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
