खेड (प्रतिनिधी) : – मुंबई गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यतच्या चौपदरीकरणाची कामे पूर्ण झाल्याने प्रवास वेगवान झाला आहे. वेरळ येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होवून एकेरी मार्गिका खुली झाल्याने वाहनचालकांची चिंता मिटली आहे.
वेरळ येथील उड्डाणपुलासह सर्व्हिस रोडची कामे संथगतीने सुरू होती. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने ‘अपघात स्पॉट’ बनला होता. चार प्राणांतिक अपघातही घडले होते. यानंतर तीव्र टीका झाल्यानंतर रखडलेल्या अंतर्गत कामांना गती देण्यात आली. उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडवरूनच वाहने मार्गस्थ होत होती. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली होती.