रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय – 37 वर्षे, रा. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा आज सुनावली.
हा निकाल म्हणजे समाजातील घृणास्पद गुन्हे करणा-या आरोपींना बसलेली चपराक आहे, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरावर व्यक्त होत आहे.
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉस्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. गुन्ह्याचे तपास काम कफ परेड पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केले होते.
विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी दिलेल्या निकालामुळे महिला व शाळकरी मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.