मुंबई: केंद्र सरकारच्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला समर्थन देण्यासाठी भाजपाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी आज मनसेच्या शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. यावेळी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांनी देखील नारीशक्ती अधिनियम विधेयकाला पाठिंबा दर्शवला.

तसेच मनसे नेत्या रिटाताई गुप्ता या देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांनीही मिस्ड कॉल देऊन नारीशक्ती वंदन अधिनियमाला आपला पाठिंबा दर्शवला. महिला सशक्तीकरणासाठी सर्वजण एकत्र येत इतिहास घडवत आहोत… हे क्षण पुढच्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ. वाघ विविध पक्षातील महिला नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन नारीशक्ती वंदन अधिनियमाला समर्थन आणि पाठिंबा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.