खेड (प्रतिनिधी) :  – भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव येथील तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या वतीने मंगळवारी दि. १४ एप्रिल २०२६ रोजी शहरातील जिजामाता उद्यान येथे साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने खेडमध्ये जन लसागर लोटला होता. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान असा कँडल मार्च स्थानिक तालुकाध्यक्ष मंदार गंगाराम हळदे व मुंबईचे ॲड. दिपक केरु हळदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.
दि. १४ एप्रिल रोजी सकाळी धम्मध्वजारोहण पूजापाठ यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ही मिरवणूक बसस्थानक, वाणी पेठ, गांधी चौक, तीनबत्ती नाका मार्गे जिजामाता उद्यान या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीत संविधान वर केलेला विद्यार्थीचा देखावा लक्ष्यवेधी ठरला. दुपारच्या सत्रात जाहीर सभा पार पडली. यामध्ये संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह प्रमुख वक्ते प्रा. सतिश पां. जाधव यांनी मार्गदर्शन केले.