चिपळूण : चिपळूण शहरातील मार्कंडी येथील एसीबी प्लेस्कूलच्या सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभ शहरातील साईशा हॉटेल येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून अँड.अमोल भोजने, एसीबी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन सायली भोजने,संचालक पूजा खताते, कॉन्सलर अनुराधा गोंधळेकर, अक्सा दळवी,अनुष्का लाड,अक्षया सावंत,ज्योती जगताप,अरबिया खडस,उपस्थित होते.सोनाक्षी मेहता,श्रुती दाभाडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सीनियर केजीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल व कार्यक्रमाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.पालक,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
एसीबी प्लेस्कूलमध्ये दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न
